logo
|* *|वैयक्तिक व्‍याज परतावा योजनेच्‍या लाभार्थींना सशर्त हेतू पत्रांची (Letter of Intent) मुदत वाढ करुन मिळण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन पोर्टलवर विनंती करण्याची सुविधा तयार केली आहे. लाभार्थ्यांनी त्यांच्या लॉगिन मध्ये जाऊन सशस्त्र हेतु पत्राची मुदत वाढ करण्याची विनंती करणे.

महामंडळाची स्‍थापना

वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ, मर्यादित मुंबई या महामंडळाची दिनांक 8 फेब्रुवारी, 1984 रोजी कंपनी कायदा, 1956 नुसार महामंडळाची स्‍थापना करण्‍यात आली असून सदर महामंडळ सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभागाच्‍या अधिनस्‍त कार्यरत होते. शासन अधिसूचना दिनांक 10 मार्च, 2019 अन्‍वये सामाजिक न्‍याय विभागातून इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग या स्‍वतंत्र विभागची स्‍थापना करण्‍यात आली असून शासन निर्णय क्रमांक इमाव 2016/प्र.क्र.95/आस्थापना, दि.24 जुलै, 2019 नुसार इतर मागास बहुजन कल्‍याण विभाग असे नामकरण करण्‍यात आले आहे. सदर विभागाच्‍या अधिनस्‍त वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ कार्यरत आहे.


महामंडळ स्थापनेची उद्दिष्टे

सदर महामंडळामार्फत विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्‍यक्‍तींना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्‍नतीकरिता विविध योजनांची अंमलबजावणी करण्‍यात येते.

मुख्यालय

जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड क्र. 09,
विलेपार्ले ( पश्चिम ), मुंबई 400 049.
दूरध्वनी. 2620 2588 | 2620 2588
Department
-: मुख्यालयातील अधिकारी / कर्मचारी :-
अ.क्र. नाव पदनाम
1. श्री. प्रफुल्ल ठाकूर मा. व्यवस्थापकीय संचालक
2. श्रीमती स्‍मिता हिंदळेकर महाव्यवस्थापक
3. श्री. आधार ताजणे व्यवस्थापक प्रकल्प
4. श्री. पोपट गिते कार्यालयीन सहाय्यक प्रकल्प विभाग